Chikkodi

दूधगंगा नदीला पूर; एकसंबा येथील कर्लहोंडलिंगेश्वर मंदिर पाण्याखाली

Share

महाराष्ट्रातील धरणांमधून येणाऱ्या पाण्यामुळे दूधगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली असून, एकसंबा शहरातील कर्लहोंडलिंगेश्वर मंदिर पाण्याखाली गेले आहे. त्यामुळे, मंदिर दर्शनासाठी बंद ठेवण्यात आले आहे.

महाराष्ट्रातील धरणांमधून पाणी सोडण्यात येत असल्यामुळे चिकोडी तालुक्यातील एकसंबा शहरातील दूधगंगा नदीला पूर आला आहे. यामुळे दूधगंगा नदीचे पाणी कर्लहोंडलिंगेश्वर मंदिरासह आसपासच्या भागातही पाणी शिरले आहे अशी माहिती आशिष हुक्केरी या भाविकाने दिली.

याचप्रमाणे मंदिर सेवा समितीचे सदस्य सुधाकर उप्पर म्हणाले, महाराष्ट्रातील धरणातून होणाऱ्या पाण्याच्या विसर्गामुळे दूधगंगा नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली असून कर्लहोंडलिंगेश्वर मंदिर पाण्याखाली गेले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून मंदिरातील अन्नधान्य आणि इतर महत्त्वाचे साहित्य सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे.

Tags: