हुक्केरी ग्रामीण विद्युत सहकारी संघ या संस्थेचे रक्षण करणे आणि तिला बळकट करणे हे आपले कर्तव्य आहे, असे सार्वजनिक बांधकाम आणि बेळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री सतीश जारकीहोळी म्हणाले.

हुक्केरी शहराच्या संकेश्वर रस्त्यावरील नेसरी गार्डनमध्ये आयोजित हुक्केरी ग्रामीण विद्युत सहकारी संघाच्या २०२५ च्या निवडणुकीच्या पूर्वतयारी सभेला ते संबोधित करत होते. यावेळी ते म्हणाले की, ‘दिवंगत अप्पाणगौडा पाटील यांनी सामान्य लोकांसाठी स्थापन केलेल्या संस्था आज उद्ध्वस्त झाल्या आहेत. आम्ही त्यांना पुन्हा उभारी देण्याचा प्रयत्न करत आहोत. संस्था वाचवणारे आणि संस्था बुडवणारे यांच्यातील फरक जनतेने लक्षात घेतला पाहिजे.’ २०२५ ची ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची असून, सर्वांनी एकजुटीने प्रचार सुरू करून ही निवडणूक जिंकावी आणि संस्थेला आणखी मजबूत करावे, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी मंत्री सतीश जारकीहोळी यांनी ‘स्वातंत्र्यसैनिक, सहकारी नेते दिवंगत अप्पाणगौडा पाटील’ यांच्या पुस्तकाचेही प्रकाशन केले. दिवंगत अप्पाणगौडा पाटील यांनी हुक्केरीसाठी दिलेल्या योगदानाची माहिती घरोघरी पोहोचवा, असेही त्यांनी सांगितले.


Recent Comments