धारवाडहून प्रवाशांना घेऊन कलघटगीकडे जाणाऱ्या सरकारी बसला धारवाड-कळघटगी रस्त्यावरील नायकन हुल्लीकट्टी क्रॉसजवळ अपघात झाला. पुढील वाहनाला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात ही बस रस्त्यालगतच्या खड्ड्यात उतरली. चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला.

येरिकोप्पा ओलांडल्यानंतर नायकन हुल्लीकट्टी क्रॉसजवळ बस चालकाने एका वाहनाला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी बसचे एक चाक रस्त्यावरून खाली उतरले. पावसामुळे चिखलात रूपांतर झालेल्या मातीत चाक फसले आणि बस खड्ड्यात अडकली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. चालकाने बस बाहेर काढण्याचा खूप प्रयत्न केला, पण अर्धी बस मातीतच रुतून बसली.
अपघातानंतर तात्काळ प्रवाशांसाठी दुसऱ्या बसची व्यवस्था करण्यात आली. बस चालकाच्या सतर्कतेमुळे मोठा अपघात टळला. हा अपघात धारवाड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला आहे.


Recent Comments