पवित्र श्रावण महिन्याच्या शेवटच्या सोमवारी चिक्कोडी तालुक्यातील यडूर येथील श्री वीरभद्रेश्वर मंदिरामध्ये भाविकांनी मोठी गर्दी केली होती. दिवसभर दर्शनासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

‘दक्षिण काशी’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या यडूर येथील श्री वीरभद्रेश्वर आणि भद्रकाली देवीचे दर्शन घेण्यासाठी कर्नाटक, महाराष्ट्र आणि आंध्रप्रदेशातून मोठ्या संख्येने भाविक दाखल झाले होते. भाविकांनी रांगेत उभे राहून शांततेत दर्शन घेतले.
श्रावण महिन्यामुळे भाविकांनी अत्यंत भक्तिभावाने श्री वीरभद्रेश्वर देवावर अभिषेक केला. त्याचबरोबर श्री वीरभद्रेश्वर देवाची विशेष पूजा, आरती आणि नैवेद्य असे विविध धार्मिक कार्यक्रमही आयोजित करण्यात आले होते. पहाटेच्या वेळी पालखी सोहळाही मोठ्या भक्तीभावाने पार पडला. दर्शनासाठी आलेल्या भाविकांसाठी महाप्रसादाचीही व्यवस्था करण्यात आली होती.


Recent Comments