उगार बुद्रुक येथील आमदार आदर्श शाळेत उगार क्लस्टरमधील १० शाळांमधील इयत्ता ५ वी ते १० वी पर्यंतच्या वार्षिक परीक्षेत पहिले तीन क्रमांक मिळवलेल्या १०० विद्यार्थ्यांना स्वामीजींच्या उपस्थितीत प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी डॉ. अभिनव स्वामीजींनी विद्यार्थ्यांना आशीर्वाद दिले.

विद्यार्थी त्यांच्या शिक्षणात किंवा इतर कामांमध्ये यशस्वी झाल्यास त्यांना प्रोत्साहन देणे महत्त्वाचे आहे. असे केल्यास ते अधिक चांगल्याप्रकारे शिक्षण घेऊन समाजात जबाबदार नागरिक बनतात. समाजसेवक आणि कोळी समाजाचे नेते सुरेश कोळी यांच्या नेतृत्वाखाली हे कार्य अनेक वर्षांपासून सुरू आहे, जे इतरांसाठी आदर्श आहे, असे परमानंदवाडी येथील अभिनव मठाचे डॉ. अभिनव स्वामीजी यांनी उगाडी येथे सांगितले.
उगारचे समाजसेवक दादा चौधरी, अप्पासाहेब सनदी आणि सुरेश कोळी यांच्या आर्थिक मदतीने विद्यार्थ्यांना स्वामीजींच्या हस्ते प्रमाणपत्र, पाठ्यपुस्तके आणि शैक्षणिक साहित्य वाटण्यात आले.
या कार्यक्रमाला कडय्या मठाचे प.पू. कडय्या हिरेमठ स्वामीजी उपस्थित होते. कगवाडचे गटशिक्षणाधिकारी पी.बी. मदबावी, ज्येष्ठ समाजसेवक डी.एस. चाळेकर, सीडीपीओ संजीवकुमार सदलगे, सी.आर.पी. एस.के. मेकळे, मुख्याध्यापक डी.एस. मोरे, सौ. ए.बी. कामते, जी.जी. मांजेरे, ग्रामपंचायतीचे उपाध्यक्ष अमीन शेख, व्ही.एस. कांबळे, पी.एम. खुरपे, सिद्राय माळी, रायप्पा कोळी, तम्मन हेगडे, सौ. शैला सुरेश कोळी, शांतू कुसनाळे, गंगाणा कुंभार, श्रीकांत हाडपड यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते


Recent Comments