राज्याच्या महिला आणि बालकल्याण विभागाच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांचे सासरे आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते गुरुसिद्धप्पा सिद्धप्पा हेब्बाळकर (९४) यांचे आज सकाळी निधन झाले. त्यांच्या निधनामुळे राजकीय आणि सहकार क्षेत्रात शोककळा पसरली आहे.

खानापूर येथील समादेवी गल्लीचे रहिवासी असलेले गुरुसिद्धप्पा हेब्बाळकर यांनी भाग्यालक्ष्मी सहकारी साखर कारखाना आणि पीएलडी बँकेचे संचालक म्हणून काम पाहिले होते. याशिवाय, त्यांनी सामाजिक क्षेत्रातही आपले योगदान दिले होते. आज सायंकाळी ५ वाजता खानापूर येथील लिंगायत स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती कुटुंबियांनी दिली आहे.


Recent Comments