Chikkodi

चिकोडीजवळ तरुणाची निर्घृण हत्या

Share

चिकोडी-मिरज रस्त्यावरील चिकोडी तालुक्यातील अंकली गावात एका तरुणाची निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

ही घटना रात्री ८ च्या सुमारास घडली. हुसेनसाहेब दस्तगीर परिट (२५) असे खून झालेल्या तरुणाचे नाव असून, तो हुक्केरी तालुक्यातील यमनमर्डी येथील रहिवासी होता. हुसेनसाहेब दुचाकीवरून जात असताना काही अज्ञात व्यक्तींनी त्याची हत्या केली.

घटनेची माहिती मिळताच सीपीआय विश्वनाथ चौगला आणि पीएसआय नंदीश यांनी घटनास्थळी भेट दिली असून, आरोपींचा शोध घेण्यासाठी तपास सुरू केला आहे. ही घटना अंकली पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे.

Tags: