बेळगाव-खानापूर रस्त्यावरील प्रभू नगर गावाजवळ एका भीषण अपघातात दुचाकीवरील एका जवानाचा जागीच मृत्यू झाला आहे. दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला.

याबाबत अधिक माहिती अशी कि, सूरज मोहन द्रोपडकर नावाचा जवान आपल्या दुचाकीवरून जात असताना, अचानक त्याचे नियंत्रण सुटले आणि दुचाकी थेट दुभाजकावर आदळली. या अपघातात सूरजचा घटनास्थळीच मृत्यू झाला. खानापूर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन पाहणी सुरू केली आहे.
अल्ताफ एम बसरीकट्टी
इनन्यूज खानापूर
Recent Comments