संततधार पावसामुळे पहिल्यांदा पेरणी केलेले भाताचे पीक पूर्णपणे वाया गेल्याने शेतकऱ्यांच्या स्वप्नांवर पाणी फिरले आहे. हातातोंडाशी आलेले पीक नष्ट झाल्याने त्यांना पुन्हा एकदा दुबार पेरणी करावी लागत आहे.

यंदा पावसाने अकाली हजेरी लावल्याने दरवर्षीप्रमाणे भाताची पेरणी करून चांगल्या पिकाची अपेक्षा असलेल्या शेतकऱ्यांचा अंदाज चुकला आहे. अतिवृष्टीमुळे कष्टपूर्वक वाढवलेले पीक पाण्याखाली गेले. त्यामुळे पुन्हा कर्ज काढून आणि दुसऱ्यांची मदत घेऊन पेरणी करत असल्याचे चित्र बेळगाव तालुक्यात दिसत आहे. बेळगाव तालुक्यातील उचगाव, सुळगा, कल्लेहोळ, कुद्रेमणी, हलगा, बस्तवाड आणि इतर ठिकाणी मोठ्या प्रमाणावर भातशेती केली जाते. बटाटा आणि इतर भाज्या ही त्यांची अतिरिक्त पिके आहेत.
जास्त पावसामुळे पहिल्यांदा लावलेले भात नष्ट झाले असून, आता पुन्हा लावणी केली जात आहे. यावर्षी पाऊस लवकर सुरू झाल्याने शेतकरी द्विधा मनःस्थितीत आहेत. पहिल्यांदा भात आणि नंतर बटाटा व इतर पिके घेणार असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
भातासोबतच ऊस, रताळी, बटाटे आणि इतर पिकेही येथे घेतली जातात. पहिल्यांदा पेरलेले भात पाण्याखाली गेल्याने, आता पुन्हा भात लावण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.
Recent Comments