Uncategorized

खानापूरच्या इटगी-मुनावळी मार्गावर मोराचे मनमोहक नृत्य

Share

इटगी-मुनावळी मार्गावरील रस्त्याच्या कडेला एका सुंदर मोराने आपला पूर्ण पिसारा फुलवून नृत्य केल्याचा मनमोहक क्षण रणजित नागराज बेळवडी यांनी आपल्या मोबाईलमध्ये कैद केला आहे.

कोणत्याही भीतीशिवाय आपला पूर्ण पिसारा फुलवून नृत्य करतानाचा हा देखावा अत्यंत विलोभनीय दिसत आहे. खानापूर तालुका हा वनक्षेत्राच्या जवळचा भाग असल्याने येथील निसर्गरम्य वातावरण सुंदर आहे. अशा वातावरणात रिमझिम पावसात मोराच्या नृत्याचे हे दृश्य खरोखरच मनमोहक आहे.

अल्ताफ एम बसरीकट्टी
इनन्यूज खानापूर

Tags: