Belagavi

रायचूरमध्ये ८ ते २५ ऑगस्ट दरम्यान अग्निवीर भरती शिबिर

Share

भारतीय सैन्य दलातील अग्निवीर भरती शिबिर ८ ते २५ ऑगस्ट दरम्यान रायचूरमधील कर्नाटक कृषी विज्ञान विद्यापीठाच्या मैदानावर आयोजित केले जाणार आहे. या शिबिरात बेळगावसह सहा जिल्ह्यांतील उमेदवारांना संधी मिळणार आहे.

८ ते २५ ऑगस्ट दरम्यान रायचूरमधील कर्नाटक कृषी विज्ञान विद्यापीठाच्या मैदानावर बेंगळुरू भरती क्षेत्राचे मुख्य कार्यालय आणि रायचूरच्या नागरी प्रशासनाच्या सहकार्याने अग्निवीर भरती शिबिर होणार आहे. या शिबिरात बेळगाव, बिदर, कलबुर्गी, कोप्पळ, रायचूर आणि यादगीर या जिल्ह्यांमधून निवडलेल्या उमेदवारांना सहभागी होता येईल. १२ मार्च रोजी बेळगाव सैन्य भरती कार्यालयाने वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता आणि इतर निकष जाहीर केले आहेत.

सामान्य प्रवेश परीक्षेचा निकाल www.joinindianarmy.nic.in या संकेतस्थळावर आधीच प्रसिद्ध करण्यात आला आहे. निवड झालेल्या उमेदवारांना प्रवेशपत्रे देण्यात आली आहेत. ही प्रवेशपत्रे भारतीय लष्कराच्या वेबसाइटवरूनही मिळवता येतील. उमेदवारांनी त्यांच्या खाते प्रवेशाद्वारे आणि नोंदणीकृत ईमेल आयडीद्वारे प्रवेशपत्र डाउनलोड करावे. प्रवेशपत्रात नमूद केलेल्या तारखेला शिबिरात उपस्थित राहणे अनिवार्य आहे.

उमेदवारांना कोणत्याही दलालाच्या किंवा मध्यस्थांच्या आमिषांना बळी न पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे. उमेदवारांची निवड प्रक्रिया ऑनलाइन सीइइ, भरती शिबिरात घेण्यात येणाऱ्या परीक्षा आणि अंतिम गुणवत्तेच्या आधारावर केली जाईल, अशी माहिती भरती संचालक कर्नल ए.के. उपाध्ये यांनी दिली.

Tags: