Khanapur

युवा काँग्रेस अध्यक्ष साईश सुतार यांचा सन्मान

Share

खानापूर तालुका ग्रामीण युवा काँग्रेसचे अध्यक्ष साईश सुतार यांचा बैलहोंगल येथे आयोजित “युवा पर्व प्रतिज्ञा – २०२५” कार्यक्रमातील विशेष सत्कार सोहळ्यात गौरव करण्यात आला.

युवा काँग्रेस निवडणुकीत आपल्या कार्यतत्परतेने अध्यक्षपदी निवड झालेले साईश सुतार यांनी खानापूर तालुक्यात काँग्रेस पक्षाची संघटना मजबूत करण्यासाठी विविध उपक्रम राबवले आहेत. जिल्ह्याचे पालकमंत्री आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री सतीश जारकीहोळी तसेच महिला आणि बालविकास विभागाच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या हस्ते युवा काँग्रेस अध्यक्ष साईश सुतार यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी युवा काँग्रेसचे राज्याध्यक्ष मंजुनाथ गावडा एच.एस., राज्य सरचिटणीस राहुल जारकीहोळी, सवदत्तीचे आमदार विश्वास वैद्य, मृणाल हेब्बाळकर, कार्तिक पाटील यांच्यासह अनेक प्रमुख नेते आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

Tags: