कागवाड तालुक्यातील उगारचे साखर उद्योजक राजाभाऊ शिरगावकर यांच्या धर्मपत्नी व उगार मळ्यामंडळाच्या अध्यक्ष दिवंगत सौ मीनाताई शिरगावकर यांच्या 29 व्या स्मृतिदिनानिमित्त सुप्रसिद्ध शास्त्रीय संगीतकार पंडित जयतीर्थ मेंवूडी यांचा शास्त्रीय संगीत तसेच भक्ती गीतांचा स्वरलहरी कार्यक्रम उभारते पार पाडण्यात आला.

रविवारी सायंकाळी उगार येथील विहार सभाभवनामध्ये उगार महिला मंडळाच्या, व शिरगावकर बंधूंच्या सहकार्याने स्वरलहरी भक्ती गीत कार्यक्रम पार पाडण्यात आला.
महिला मंडळाच्या सेक्रेटरी सौ वैष्णवी कुलकर्णी यांनी स्वागत केले, प्रास्ताविक महिला मंडळाचे अध्यक्ष राधिकाताई शिरगावकर यांनी केले. पंडितांची ओळख. सौ अनिता कुलकर्णी यांनी केले. यावेळी माहिती देताना
पंडित जयतीर्थ मेंवूडी हे किराणा घराण्याचे वंशज असून यांनी शास्त्रीय संगीत क्षेत्रामध्ये विशेष स्थान निर्माण केले आहेत. संगीत क्षेत्रामध्ये भारत देशात इतकेच नव्हे तर अमेरिका, बांगलादेश, युरोप अनेक देशांमध्ये संगीत कार्यक्रम झाले आहेत अनेक पुरस्कार त्यांना मिळाले आहेत असे सांगितले.
पंडित जयतीर्थ मेंवूडी यांनी शास्त्रीय संगीत या विषयी माहिती देत प्रारंभी मेघ मल्हार शास्त्रीय संगीत यावरून संगीत कार्यक्रम प्रारंभ केले. नंतर सुर मल्हार बंदिष हे नाट्यगीत गायले, मोहेमारी नजरिया सावरिया, या हिंदी गीतानंतर कन्नड गीत गुरवे नी याके मुकवादे, नंतर मराठी गीत इंद्रायणी काठी लागली समाधी ज्ञानेश्वराची तसेच या सुरांनो चंद्र हा हे गीत गायले, आत्मा पांडुरंग पंचप्राण, कन्नड गीत भाग्यता लक्ष्मी बारम्मा हे गीत गाऊन उपस्थित संगीत प्रेमी यांचे मने जिंकले प्रत्येकाने मनमुक्त होऊन या कार्यक्रमाचा आस्वाद घेतला.
उगार महिला मंडळाचे अध्यक्षा राधिकाताई शिरगावकर, उपाध्यक्ष गीतालीताई शिरगावकर, उद्योगपती प्रफुल शिरगावकर, उगार महिला मंडळाच्या माजी अध्यक्ष सौ. स्मिताताई शिरगावकर, उगार साखर कारखान्याचे एम डी चंदन शिरगावकर, कोल्हापूरचे एसबी रिसेलर्सचे एमडी सचिन शिरगावकर, मिरज इनहीलचे अध्यक्ष सौ.सोनीका प्राणी, सौ. लक्ष्मीताई शिरगावकर,
सौ कीर्ती सरदेसाई यासह साखर कारखान्याचे सर्व अधिकारी वर्ग उपस्थित होते.
या संगीत कार्यक्रमला हार्मोनियम ची साथ साखर कारखान्याचे अधिकारी व संगीतकार सुरेश सरर्वेसाई यांनी दिले. तबल्याची साथ हेमंत जोशी, व पार्थ भूमकर यांनी तर टाळ गिरीश कुलकर्णी यांनी साथ दिले.
कार्यक्रम यशस्वी पार पडल्यानंतर पंडित जयतीर्थ मवूडी यांनी बोलताना म्हणाले माझे अनेक कार्यक्रम पार पडले आहेत देश नव्हे तर विदेशामध्येही कार्यक्रम संपन्न झाले आहेत मोठमोठ्या शहरांमध्ये या कार्यक्रमाला संगीत प्रेमींचे इतकी साथ नसते ती उगार येथे मिळाली आहे. असे सांगून राज्य सरकार शास्त्रीय संगीत याचा जन्मच कर्नाटक राज्यात झालेला आहे. लहान असतानाच माझ्यावर शास्त्रीय संगीताचा संस्कार झाला आहे कारण आमच्या घराण्यातच शास्त्रीय संगीत होते, शिवाय किराणा घराण्याचा माझ्यावर संस्कार झालेला मात्र सध्या शास्त्रीय गायक व संगीतकारखना प्रशिक्षण देणारे संगीत सम्राज्ञी गंगुबाई हानगल यांचे प्रशिक्षण देणारे केंद्र बंद करण्यात आले आहे. ते न करता शास्त्रीय संगीत टिकून ठेवण्यासाठी सहकार करावे असे आपले विचार मांडले.
उगार येथील संगीत प्रेमी ने पंडित शिवतीर्थ यांचा मोठ्या प्रमाणात गौरव केला. उगार सारख्या ठिकाणी अशा मोठ्या संगीतकारांची भेट घडवून आणणाऱ्या उद्योगपती शिरगावकर बंधूंचा येथील नागरिकांनी कौतुक केले.


Recent Comments