खानापूर तालुक्यातील घोटगाळी गावची रहिवासी आणि हलसी येथील शिवाजी हायस्कूलची विद्यार्थिनी निशा नारायण पाटील हिने राज्यस्तरीय जूडो स्पर्धेत दुसरे स्थान पटकावले आहे.

अथक परिश्रम, शिस्तबद्ध प्रशिक्षण आणि स्पर्धात्मक वृत्तीमुळे तिने हे यश संपादन केले आहे. निशाच्या या कामगिरीचे शिक्षक, सहकारी विद्यार्थी आणि ग्रामस्थांकडून कौतुक होत असून, तिने खानापूर तालुक्याला आनंद आणि सन्मान मिळवून दिला आहे.
Recent Comments