नवीन गॅस सिलिंडर सुरू करत असताना आग लागल्याने, कुटुंबाने बाहेर धाव घेऊन जीव वाचवल्याची घटना हुबळीच्या न्यू कॉटन मार्केट परिसरात घडली आहे.
कलकुर्गी नूलवी मेजेस्टिक नावाच्या व्यावसायिक संकुलातील सुरक्षा रक्षकाच्या घरात ही घटना घडली. त्यावेळी घरात असलेले सुरक्षा रक्षक प्रकाश कांबळे यांचे कुटुंब बाहेर पडून बचावले. घटनेची माहिती मिळताच, अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि एका मोठ्या दुर्घटनेला प्रतिबंध घातला. संकुलात अनेक कार्यालये असल्याने, तेथील कर्मचारीही धास्तावले होते आणि बाहेर पडताना दिसले.
या व्यावसायिक संकुलात गॅस सिलिंडर वापरण्याची परवानगी घेण्यात आली होती का, हे तपासातून समोर येईल.


Recent Comments