खानापूर शहरातील स्टेशन रोडवरील सरकारी वरिष्ठ प्राथमिक उर्दू मुलांच्या शाळेत नवीन एसडीएमसी समितीची स्थापना करण्यात आली. या समितीच्या अध्यक्षपदी आबिद हुसेन मुजावर यांची बिनविरोध निवड झाली, तर तहसीन मकादार यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली.

या समितीत एकूण १६ सदस्य नियुक्त करण्यात आले आहेत. या एसडीएमसी समितीच्या बैठकीत एकूण १२० पालकांनी भाग घेतला होता. यापूर्वीही आबिद हुसेन मुजावर यांनी तीन वर्षे या शाळेचे एसडीएमसी अध्यक्ष म्हणून काम पाहिले आहे. नवनिर्वाचित अध्यक्ष आबिद हुसेन मुजावर यांचा शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष इसाक खान पठाण आणि उपाध्यक्षपदी निवड झालेल्या तहसीन मकादार यांचा खानापूर नगरपंचायतीच्या सदस्या फातिमा बेपारी यांनी सत्कार केला. याप्रसंगी शाळेतील शिक्षक उपस्थित होते.
Recent Comments