बागलकोट जिल्ह्यातील हुनगुंद तालुक्यातील सुळेभावी गावातून एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. येथील डीसीसी बँकेच्या शिपायानेच तब्बल १२.५ कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचे उघडकीस आले असून, ‘कुंपणानेच शेत खाल्ल्या’सारखी ही घटना आहे.

बागलकोट जिल्ह्यातील हुनगुंद तालुक्यातील सुळेभावी गावातील डीसीसी बँकेच्या शिपायाने १२.५ कोटी रुपयांचा गंडा घातल्याचे प्रकरण उजेडात आले आहे. विशेष म्हणजे, तीन वर्षे उलटूनही या प्रकरणाचा तांत्रिकदृष्ट्या सोक्षमोक्ष लागत नाहीये. या प्रकरणाचा तपास करणारे सीआयडी अधिकारी दर तीन महिन्यांनी बदलत असल्याने अनेक शंका निर्माण झाल्या आहेत. बागलकोटच्या नवनगर येथील डीसीसी बँकेसह अमीनगड, कमतगी, गुडूर शाखांमध्ये प्रवीण पत्री नावाचा शिपाई २०१४ ते २०२२ पर्यंत कार्यरत होता. त्याने व्यवस्थापकाचा आयडी हॅक करून हा घोटाळा केला आहे. या घोटाळ्यातील पैसे त्याने सिनेमा, नाटक आणि अल्बम गाण्यांवर खर्च केल्याचे समोर आले आहे.
नवनगर सीएन पोलीस ठाण्यात याप्रकरणी २३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, सीआयडीकडून योग्य तपास होत नसल्याने डीसीसी बँकेचे अध्यक्ष अजयकुमार सरनाईक यांनी नाराजी व्यक्त केली आहे. सीआयडी अधिकारी तीन वर्षांपासून योग्य तपास करत नसल्याने आणि अधिकाऱ्यांच्या सततच्या बदल्यांमुळे अनेक संशयांना वाव मिळाला आहे, असे डीसीसी बँकेचे अध्यक्ष अजयकुमार सरनाईक यांनी म्हटले आहे.
Recent Comments