बेळगाव-पणजी मार्गाची दुरवस्था अपघातांना निमंत्रण देत आहे. रस्त्याच्या धोकादायक स्थितीमुळे नागरिक संताप व्यक्त करत आहेत.

बेळगाव-पणजी महामार्गावरील लोंढाफाटाजवळील रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले असून, परिस्थिती अत्यंत भयानक आहे. पावसामुळे रस्त्यावर तयार झालेल्या मोठ्या खड्ड्यांमध्ये पाणी साचले आहे.

विकासापासून वंचित असलेल्या या रस्त्यावर चिखलमय वातावरण निर्माण झाले असून, वाहनचालक आणि याच मार्गावरून शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.

अनेक वेळा वाहने खड्ड्यांमध्ये अडकून अपघातही घडले आहेत. ग्रामपंचायतीच्या निदर्शनास आणूनही ते याकडे दुर्लक्ष करत आहेत. महामार्ग प्राधिकरणाने कोणतेही सूचना फलकही लावलेले नाहीत. यामुळे वाहनचालकांची दिशाभूल होत आहे.


Recent Comments