Chikkodi

बैल नाही तर चक्क इ-बाईकने कोळपणी!

Share

बैलांऐवजी इलेक्ट्रिक बाईकला कोळपे जोडून तण नियंत्रणासाठी पुढे सरसावलेल्या एका शेतकऱ्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. हा शेतकरी कोण आहे, हे जाणून घेण्यासाठी ही बातमी नक्की पहा..

वेळेवर कृषी मजूर न मिळणे आणि बैलांची उपलब्धता नसणे या कारणामुळे शेतकरी अजित भीमप्पा निडगुंदी यांनी अशा प्रकारे पिकांची काळजी घेतली आहे. कबूर शहरापासून २ किमी अंतरावर त्यांची ३० एकर जमीन असून, ते विविध पिके घेतात. मात्र, योग्य वेळी मजूर न मिळाल्याने तण काढणे शक्य होत नव्हते. त्यांच्याकडे कोळपे मारण्यासाठी बैलही नव्हते. त्यामुळे, कृषी विभागाने दिलेल्या नवीन प्रकारच्या कोळप्याला आपल्या इलेक्ट्रिक बाईकला जोडून त्यांनी सोयाबीन पिकातील तण नियंत्रित करण्यासाठी कोळपे मारले.

एकाने बाईक चालवली, तर दुसऱ्या एका व्यक्तीने सोयाबीनच्या ओळींमध्ये कोळपे पकडून काम केले. त्यांनी एकूण ५ एकर सोयाबीनचे पीक घेतले असून, इलेक्ट्रिक बाईकच्या मदतीनेच कोळपे मारले आहेत. एका दिवसात त्यांनी सुमारे दोन एकर क्षेत्रात अशा प्रकारे कोळपे मारून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.  थोडक्यात, बैलांच्या मदतीने कोळपे मारणाऱ्या शेतकऱ्याने, आपल्या इलेक्ट्रिक बाईकच्या माध्यमातून कोळपे मारून सर्वांचे लक्ष वेधले आहे.

Tags: