१२ जुलै रोजी बेळगावमध्ये लोकअदालत आयोजित करण्यात येणार आहे. तसेच, सरकारी योजनांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी विधी सेवा प्राधिकरणातर्फे जनजागृती केली जाईल अशी माहिती बेळगाव जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव संदीप पाटील यांनी दिली.

आज बेळगावमध्ये पत्रकार परिषद घेऊन ते बोलत होते. संदीप पाटील म्हणाले की, “सर्व विभागांच्या सहकार्याने सुमारे २० हजार प्रकरणे निकाली काढण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. ४० हजारांहून अधिक प्रकरणे शिफारस करण्यात आली आहेत. एकूण ८५ न्यायालयांमध्ये ४७ हजार प्रकरणे प्रलंबित आहेत. यामध्ये कॅनरा बँकेची १५ प्रकरणे आहेत. कर्नाटक विधी सेवा प्राधिकरणाच्या आदेशानुसार, दररोज लोकअदालत घेण्यास परवानगी देण्यात आली आहे.”
पुढे बोलताना ते म्हणाले की, “राज्य सरकारच्या अनेक योजनांची माहिती लोकांना देण्यासाठी जनजागृती करण्याची जबाबदारी आम्हाला देण्यात आली आहे. ज्यांना माहिती आहे, तेच या योजनांचा लाभ घेत आहेत, पण माहिती नसल्यामुळे अनेक लाभार्थी या योजनांपासून वंचित राहत आहेत. सुमारे २९ योजना आहेत. या योजना किती प्रमाणात लोकांपर्यंत पोहोचत आहेत, याचा आढावा घेऊन लोकांमध्ये जनजागृती केली जाईल.”
Recent Comments