बेळगावच्या ज्योति महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना आणि केएलई रुग्णालयाच्या संयुक्त विद्यमाने ११ जुलै रोजी जागतिक लोकसंख्या दिन साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्राध्यापक डी. ए. निंबाळकर यांनी स्वागतपर भाषण केले. यावेळी बोलताना डॉ. नागराज पाटील म्हणाले, “जगाची लोकसंख्या ज्या वेगाने वाढत आहे, ते पाहता भविष्यात माणसाला राहायला जागा किंवा खायला अन्नही मिळणे कठीण होईल.” ते पुढे म्हणाले, “सध्या जगाची लोकसंख्या ८.२३ अब्ज आहे, ज्यात भारताची लोकसंख्या १४६ कोटींवर पोहोचली आहे. २०२३ पासून भारताने चीनला मागे टाकले आहे, हे विशेष. भारत आणि चीन मिळून जगातील सुमारे ४०% लोकसंख्या व्यापतात.”
यावेळी जागतिक लोकसंख्या या विषयावर चर्चा आणि प्रश्नमंजुषा स्पर्धा घेण्यात आली. स्पर्धेत विजयी झालेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाला प्रा. विनायक सावंत, दत्तु कंग्राळकर, महेश जाधव, गुरु गुंजिकर यांच्यासह अनेक विद्यार्थी आणि राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक उपस्थित होते.
Recent Comments