Belagavi

बेळगावात ३७ वर्षीय माजी सैनिकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

Share

राज्यात हृदयविकाराच्या झटक्यांचे प्रमाण वाढत असताना, बेळगाव शहरात गुरुवारी अशीच एक दुर्दैवी घटना घडली आहे. भारतीय सैन्यातून निवृत्त झालेल्या एका माजी सैनिकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. ही घटना बेळगाव शहरातील अनगोळ परिसरात घडली.

इब्राहिम देवलापूर (३७) असे मृत माजी सैनिकाचे नाव आहे. भारतीय सैन्यात सेवा दिल्यानंतर ते निवृत्त होऊन आपल्या गावी परतले होते. गुरुवारी ते अनगोळ परिसरातील बाजारात ते गेले असता, त्यांना अचानक छातीत दुखू लागले आणि ते जागेवरच कोसळले. तिथे उपस्थित असलेल्या स्थानिकांनी तात्काळ त्यांना रुग्णालयात हलवले, मात्र दुर्दैवाने रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्यांचे निधन झाले. हे दृश्य परिसरातील एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे.

Tags: