Belagavi

आझम नगर येथील उर्दू मॉडेल शाळा ‘शहरस्तरीय सर्वोत्तम शाळा’

Share

बेळगाव मधील आझम नगर येथील शासकीय मॉडेल उर्दू हायर प्रायमरी स्कूल क्रमांक ११ ला शिक्षण विभागाकडून ‘शहरस्तरीय सर्वोत्तम शाळा’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

शाळेच्या सर्वांगीण विकासातील योगदानाबद्दल हा गौरव करण्यात आला. शाळेत आयोजित सत्कार समारंभात आमदार आसिफ राजू सेठ यांनी मुख्याध्यापिका शमिम मुल्ला यांना प्रमाणपत्र आणि पुरस्कार प्रदान केला.

यावेळी एस.डी.एम.सी.चे अध्यक्ष वसीम वतनदार यांनी पुष्पगुच्छ देऊन सर्वांचे स्वागत केले. सामाजिक कार्यकर्ते इम्रान फतेहखान, बीआरसी हिरेमठ, बीआरपी रिझवान नावगेकर, सीआरपी इंद्रा काळे, बाबाजीन पठाण आणि आफताब बनेदार आदी मान्यवर उपस्थित होते.

आमदार राजू सेठ यांनी यावेळी शाळेतील कर्मचारी आणि एस.डी.एम.सी.च्या सदस्यांचे अभिनंदन केले. त्यांनी सर्वांना भविष्यात आणखी कठोर परिश्रम करण्याचे आवाहन केले.

Tags: