Uncategorized

लोंढ्याजवळ ट्रकला अपघात: गोव्याला जाणारे जनावरे सुखरूप

Share

बेळगाव-पणजी राष्ट्रीय महामार्गावरील लोंढा रेल्वे गेटजवळ गोव्याला जनावरे घेऊन जाणारा एक ट्रक उलटून अपघात झाला.

ट्रकमध्ये अवैध मार्गाने ११ जनावरांची वाहतूक केली जात होती आणि ती अपघातानंतर अडकून पडली होती. घटनेची माहिती मिळताच लोंढा पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचले. त्यांनी जेसीबीच्या साहाय्याने अडकलेल्या सर्व जनावरांना सुखरूप बाहेर काढून त्यांचे प्राण वाचवले.

या अपघाताप्रकरणी लोंढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.

Tags: