Uncategorized

जोशीमळा आत्महत्येप्रकरणी तीन आरोपींना अटक

Share

जोशीमळा येथे विष प्राशन करून तिघांनी आत्महत्या केल्याच्या प्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली असल्याची माहिती शहर पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे यांनी गुरुवारी बेळगावात पत्रकारांशी बोलताना दिली.

संतोष कुराडेकर, सुवर्णा कुराडेकरआणि मंगला कुराडेकर यांनी विषप्राशन करून आत्महत्या केली होती. त्यावेळी घटनास्थळी आढळलेल्या ‘डेथ नोट’च्या आधारे राजेश कुडतरकर, भास्कर सोनारकर आणि नानासो शिंदे या आरोपींना अटक करण्यात आली आहे, असे पोलीस आयुक्तांनी सांगितले.

विषारी द्रव्य प्राशन केलेली महिला सुनंदा कुराडेकर सध्या रुग्णालयात उपचार घेत असून, तिची प्रकृती चिंताजनक आहे. तिच्याकडून अद्याप अधिक माहिती मिळू शकलेली नाही. तिनेही ‘आमच्या भावाचे ५०० ग्रॅम सोने राजेशच्या घरी आहे,’ असे सांगितले होते. शहापूर पोलिसांनी छापा टाकल्यावर ६०० ग्रॅम सोने आणि ४ लाख रुपये रोख रक्कम मिळाली आहे. याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.

नागरिकांनी कर्ज घेताना अधिकृत आणि नोंदणीकृत संस्थांकडूनच घ्यावे, असे आवाहन पोलीस आयुक्तांनी केले आहे.

Tags: