Uncategorized

देशपांडे गल्लीतील श्री अक्कलकोट स्वामी समर्थ मंदिरात गुरुपौर्णिमेनिमित्त भाविकांची गर्दी

Share

बेळगाव शहरातील देशपांडे गल्ली येथील श्री अक्कलकोट स्वामी समर्थ मंदिरात आज गुरुपौर्णिमेनिमित्त विशेष पूजा आणि विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने मंदिरात सकाळपासूनच भाविकांनी गर्दी केली होती. भक्तिमय वातावरणात सर्वांनी एकत्र येऊन सामूहिक आरती केली. या प्रसंगी मोठ्या संख्येने भाविकांनी उपस्थित राहून स्वामी समर्थांच्या दर्शनाचा लाभ घेतला.

Tags: