Belagavi

वृत्तपत्र दिनानिमित्त क्रिकेट सामन्यांचे आयोजन

Share

बेळगावच्या इलेक्ट्रॉनिक मीडिया असोसिएशनतर्फे पत्रकार दिनानिमित्त आयोजित क्रिकेट स्पर्धेची जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी सुरुवात करून दिली.

गुरुवारी बेळगाव मधील जिल्हा पोलीस क्रीडांगणावर जिल्हाधिकारी आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया संघ यांच्यातील सामन्याला जिल्हा परिषद सीईओ आणि जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. भीमाशंकर गुळेद यांच्या हस्ते सुरुवात झाली. काँग्रेस नेते मृणाल हेब्बाळकर यांनीही फलंदाजी करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

पहिला सामना जिल्हाधिकारी आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया संघात झाला, तर दुसरा सामना एसपी ११ आणि वन विभागाच्या संघात झाला. दोन दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत पोलीस आयुक्त संघ, व्हिटियू संघ, बीम्स संघ, महानगरपालिका संघ, पशुसंवर्धन विभाग संघ, प्रिंट मीडिया संघ, जिल्हा परिषद संघ, उत्पादन शुल्क विभाग संघ, जिल्हा आरोग्य विभाग संघ, अन्न व नागरी पुरवठा विभाग संघ, के.एस.आर.टी. संघ, डीसीडब्ल्यू संघ, चिकोडी मीडिया संघ यासह इतर संघांचे थरारक सामने होणार आहेत. आयोजकांनी दोन दिवस चालणाऱ्या या सामन्यांमध्ये सहभागी होऊन यशस्वी करण्याचे आवाहन केले आहे.

Tags: