Belagavi

वडगावात रांगोळीतून श्री रामकृष्ण परमहंस यांना आदरांजली

Share

गुरुपौर्णिमेनिमित्त रांगोळी कलाकार अजित औरवाडकर यांनी वडगावातील ज्योती फोटो स्टुडिओ येथे श्री रामकृष्ण परमहंस यांचे सुंदर भावचित्र रांगोळीतून साकारले आहे.

२ फूट बाय ३ फूट आकाराची ही कलाकृती तयार करण्यासाठी त्यांना ११ तास लागले. या रांगोळीसाठी लेक कलरचा वापर करण्यात आला आहे. औरवाडकर यांनी रेखाटलेली रांगोळी पाहण्यासाठी ज्योती फोटो स्टुडिओ, वडगाव येथे १५ जुलैपर्यंत सकाळी ९ ते रात्री ९ वाजेपर्यंत भेट देता येईल.

Tags: