बेळगाव : गणेशपुर येथील संत मीरा इंग्रजी माध्यम शाळा आयोजित बेळगांव जिल्हास्तरीय विद्याभारती सांघिक क्रीडा स्पर्धांना मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला

या सांघिक बुद्धिबळ, योगा, कराटे, मलखांब जिल्हास्तरीय स्पर्धेच्या उद्घाटनाला प्रमुख म्हणून विद्याभारती बेळगाव जिल्हाअध्यक्ष माधव पुणेकर, उपाध्यक्ष रामनाथ नाईक,सचिव एस बी कुलकर्णी, संत मीरा इंग्रजी माध्यम गणेशपुर शाळेचे अध्यक्ष डॉ विजय गोवेकर, सचिव देवीप्रसाद कुलकर्णी, सदस्य रमेश लद्दड, चिंतामणी ग्रामोपाध्ये, संत मीरा इंग्रजी शाळा गणेशपुर मुख्याध्यापिका आरती पाटील,विद्याभारती जिल्हा शारीरिक प्रमुख चंद्रकांत पाटील या मान्यवरांच्या हस्ते क्रिडाध्वजारोहण , ओंकार सरस्वती भारत माता फोटो पुजन, दिपप्रज्वलन व विविध खेळांच्या फाईलचे उद्घाटन करण्यात आले
यानंतर विविध मान्यवरांनी खेळाडूंना मार्गदर्शन केले.याप्रसंगी प्रशिक्षक विनायक दंडकर,निलेश गुरखा,हरिष सोनार, श्रीकांत कांबळे , प्रभाकर किल्लेकर,मधु पाटील, प्रशांत वाडकर, अनुराधा पुरी,अनिता नाईक,स्वाती सावंत,ओमकार गावडे,आशा भुजबळ, प्रफुल्ल पाटील, स्वप्निल पाटील,श्वेता पाटील, रोहिणी पाटील,अनिषा कलमण्णावर सह शाळेचा शिक्षक वर्ग उपस्थित होता.कायकमाचे सूत्रसंचालन रसिका बिर्जे तर प्रतीक्षा नुलेकर यांनी आभार मानले. या स्पर्धेत संत मीरा अनगोळ, संत मीरा गणेशपुर, देवेंद्र जीनगौडा शिंदोळी ,शांतिनिकेतन पब्लिक स्कूल खानापूर, स्वामी विवेकानंद स्कूल खानापूर, गजाननराव भातकांडे स्कूल बेळगांव ,शाळेचे 250 हुन अधिक खेळाडूंनी या स्पर्धेत भाग घेतला होता.
बेळगांव प्रमुख पाहुणे एस बी कुलकर्णी दीपप्रज्वलन करून स्पर्धेचे उद्घाटन करताना शेजारी डॉ विजय गोवेकर माधव पुणेकर आरती पाटील प्रसाद कुलकर्णी चंद्रकांत पाटील.
Recent Comments