बेळगाव: विद्यार्थ्यांनी आपल्या मातृभाषा जास्त महत्व दिले पाहिजे. तरीच आपली भाषा मोठी होऊ शकते. विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांचा व शिक्षकांचा आदर केला पाहिजे. भविष्यात भविष्यात विद्यार्थी यशस्वी होण्यासाठी चार गुरुमंत्र्यांचा वापर करून कसे मोठे बनावे याचे गुरु मंत्र दिला. अभ्यास करते वेळी किती तास अभ्यास करणे हे गरजेचे नाही आपण कसा अभ्यास करतो त्यावर महत्व आहे. असे प्रतिपादन धारवाडचे एमडी डॉ.संजीव कुलकर्णी यांनी केले.

जीआयटी महाविद्यालयाच्या गोल्डन जुबली सभागृहात आयोजित केलेल्या संस्थापक दिनानिमित्त ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर संस्थेचे सभासद हे एक कुलकर्णी, संस्थेच्या चेअरमन उज्वला मंडळी, मुख्याध्यापिका लक्ष्मी देशपांडे, हॅड बॉय तेजस बेळगावकर, हेड गर्ल आइष्या रेवणकर आदी व्यासपीठावर उपस्थित होते. प्रारंभी भरतनाट्यम नृत्याने कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. पाहुण्यांचे स्वागत मुख्याध्यापिका लक्ष्मी देशपांडे यांनी केले. यावेळी एसएसएलसी परीक्षेत विशेष उत्तीर्ण झालेल्या समृद्धी मूल्या, मंदार दळवी, निधी जोशी यांच्यासह 41 विद्यार्थ्यांचा व त्यांच्या पालकांचा त्यांचा खास सत्कार करण्यात आला.
यावेळी अध्यक्ष नियभाषणात उज्वला मुडगी म्हणाल्या गतवर्षीपेक्षा यावर्षी 90% हून अधिक मिळवलेल्या विद्यार्थ्यांची यादी जास्त आहे पुढील काळात शाळेतील सर्व विद्यार्थी 90 टक्के पेक्षा जास्त गुण मिळवून शाळेच्या सत्कार समारंभात जास्ती संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन त्यांनी केले. यावेळी संस्थेचे सभासद एस व्ही गणाचारी, व्ही एम देशपांडे, राजेंद्र बेळगावकर, आर एस मुतालिक सह शिक्षक वर्ग विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रिचा लग्नंवर रिचा लग्नामणवर, तनई गिरी यांनी केले. तर अन्वेषा शिरहट्टी हीने आभार मानले.
Recent Comments