बेळगाव येथील रोटरी ई-क्लबचा उद्घाटन सोहळा नुकताच पार पडला. या समारंभात २०२५-२६ वर्षासाठी रोटरी ई-क्लबच्या अध्यक्षपदी कविता कणगन्नी यांची निवड करण्यात आली.

बेळगावातील वसंतराव पोतदार पॉलिटेक्निकच्या सेमिनार हॉलमध्ये आयोजित या सोहळ्यात माजी जिल्हा गव्हर्नर रोटेरियन वेंकटेश देशपांडे, माजी अध्यक्ष रोटेरियन लक्ष्मी मुतालिक, माजी कार्यदर्शी रोटेरियन सागर वाघमारे, नूतन कार्यदर्शी रोटेरियन शिल्पा खडकबवी आणि सहाय्यक गव्हर्नर रोटेरियन राजेशकुमार ताळेगाव यांची प्रमुख उपस्थिती होती.
या कार्यक्रमात रोटेरियन सागर वाघमारे यांनी मागील वर्षात राबवलेल्या योजनांचा अहवाल सादर केला. माजी अध्यक्ष लक्ष्मी मुतालिक यांनी दोन आर्थिक दुर्बळ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्याची घोषणा केली.
यानंतर, माजी जिल्हा गव्हर्नर वेंकटेश देशपांडे यांनी रोटेरियन कविता कणगन्नी यांना अध्यक्षपदाची सूत्रे सोपवली. रोटेरियन लता कित्तूर आणि प्रतीक्षा चाफाळकर यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले. अखेरीस, रोटेरियन सागर वाघमारे यांनी उपस्थितांचे आभार मानले. बेळगावातील रोटरी क्लबचे इतर सदस्यही या कार्यक्रमाला उपस्थित होते.
Recent Comments