गोकाक तालुक्यातील हिरेनंदी गावाच्या बाहेरच्या बाजूला एका रिक्षात गळफास घेऊन प्रेमयुगुलाने आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे.

सवदत्ती तालुक्यातील मुन्नोळी शहरातील नागळिंग नगर येथील रहिवासी राघवेंद्र नारायण जाधव (२८) आणि रणजिता अडिवेप्पा चौबारी (२५) यांनी आत्महत्या केली आहे.
राघवेंद्र आणि रणजिता हे दोघे एकमेकांवर अनेक दिवसांपासून प्रेम करत होते. त्यांच्या प्रेमसंबंधांची माहिती दोन्ही कुटुंबांना नव्हती. काही दिवसांपूर्वी रणजिताचा विवाह दुसऱ्या मुलासोबत निश्चित झाला होता. यामुळे वेगळे होण्याची भीती असल्याने दोघांनी गळफास घेऊन आपले जीवन संपवले. या प्रकरणी गोकाक ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.
Recent Comments