khanapur

‘आमटे पीकेपीएस’चा अरविंद पाटलांना पाठिंबा नाही

Share

बी.डी.सी.सी. बँक निवडणुकीत माजी आमदार अरविंद पाटील यांना पाठिंबा देत असल्याची बातमी पूर्णपणे खोटी आहे. याही वेळी विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी यांनाच आमचा पूर्ण पाठिंबा राहील, अशी घोषणा खानापूर तालुक्यातील आमटे पी.के.पी.एस.चे अध्यक्ष लक्ष्मण कसरळेकर यांनी केली आहे.

पत्रकारांशी बोलताना कसरळेकर म्हणाले की, “खोट्या बातम्या पसरवून लोकांची दिशाभूल केली जात आहे. माजी आमदार अरविंद पाटील संचालक झाल्यावर त्यांनी आम्हाला कृषी पतपुरवठा कर्ज दिले नाही. त्यामुळे आमचे पॅनेल त्यांच्या विरोधात जिंकले असून, आम्ही त्यांना याही वेळी पाठिंबा देत नाहीये. योग्य निधी न मिळाल्याने पतसंस्थेतील कर्मचाऱ्यांना स्वतःच्या पैशातून वेतन देण्याची वेळ आली आहे.

” अरविंद पाटील यांनी रोखलेला निधी एम.एल.सी. चन्नराज हट्टीहोळी यांनी मंजूर केला. त्यांनी भविष्यातही लोकांना कर्ज देण्याचे आश्वासन दिले आहे. याच कारणामुळे आमटापूरसह २०-२५ संस्था अरविंद पाटील यांना नव्हे, तर विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी यांना पाठिंबा देत आहेत, असे कसरळेकर यांनी स्पष्ट केले.

यावेळी पॅनेलचे सदस्य सुभाष गावडे, नारायण पाटील, विठ्ठल नाईक, रायण्णा गावडे, जीजाबाई बामणवाडकर यांच्यासह इतर सदस्य उपस्थित होते.

Tags: