बेळगाव फेसबुक फ्रेंड्स सर्कलच्या वतीने वनक्षेत्रातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.

बेळगाव फेसबुक फ्रेंड्स सर्कलचे प्रमुख संतोष दरेकर आणि त्यांचे मित्र पराग तोरगल्ली, रवींद्र बेल्लाद तसेच संजय साबळे यांच्या सहकार्याने चंदगड न्यू इंग्लिश शाळेतील विद्यार्थ्यांना छत्र्या आणि शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.
या शाळेत काजिर्णे, धनगरवाडा यांसारख्या ८-९ किलोमीटर दूरच्या परिसरातून विद्यार्थी मुसळधार पावसात, जंगलातून आणि खराब रस्त्यांमधून चालत येतात. विद्यार्थ्यांची ही कठीण परिस्थिती लक्षात घेऊन हा मानवतावादी उपक्रम राबवण्यात आला.
या उपक्रमांतर्गत संगीत यमकर, समृद्धी यमकर, सुवर्णा पाटील, अजय पाटील, रूपाली यमकर, दयानंद यमकर, भारती पाटील, सरिता पाटील, भारत यमकर, सायली कांबळे, सारा तरळेकर, साक्षी तरळेकर, समृद्धी फाटक आणि राजेश वरद यांना ही मदत देण्यात आली.
कार्यक्रमाला शाळेचे प्राचार्य आर. पी. पाटील, उपप्राचार्य व्ही. एन. कांबळे, पुष्पा सुतार, शरद हडगळ, ओंकार पाटील आणि अमित पाटील उपस्थित होते.
Recent Comments