इतरांप्रती प्रेम आणि आपुलकी दाखवत आयुष्याचा अनुभव घ्यावा. असेच व्यक्तिमत्व नाडोज बरगुरू रामचंद्रप्पा यांचे आहे, असे कन्नड अध्यापक परिषदेचे अध्यक्ष डॉ. एस.आय. बिरादार यांनी सांगितले.

बेळगावच्या संगोळी रायण्णा प्रथम श्रेणी घटक महाविद्यालयात बसवराज कट्टिमनी प्रतिष्ठान, बेळगाव आणि राणी चन्नम्मा विद्यापीठाच्या अखत्यारीतील महाविद्यालयांच्या कन्नड अध्यापक परिषद, बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने “बसवराज कट्टिमनी कादंबरी पुरस्कार प्रदान समारंभ” आणि नाडोज बरगुरू रामचंद्रप्पा यांचे जीवन व कार्य यावर आधारित विचारसंकिरण आयोजित करण्यात आले होते. नाडोज डॉ. मनु बळिगार यांनी या विचारसंकिरणाचे उद्घाटन केले. त्यांनी नाडोज बरगुरू रामचंद्रप्पा यांचे साहित्य, नाटक, सिनेमा, विचार आणि सार्वजनिक जीवनातील अमूल्य योगदानावर विशेष भाषण दिले.
कन्नड अध्यापक परिषदेचे अध्यक्ष डॉ. एस.आय. बिरादार यांनी अध्यक्षस्थान भूषवून आपले मनोगत व्यक्त केले. बरगुरू रामचंद्रप्पांनी आपल्या सर्व विचारांमध्ये निसर्गाला महत्त्व दिले आहे. चांगल्या, समान विचारसरणीच्या लोकांना सोबत घेऊन ते नेहमीच कार्यरत असतात. इतरांप्रती प्रेम आणि आपुलकी दाखवली पाहिजे. असे व्यक्तिमत्व बरगुरू रामचंद्रप्पा यांचे आहे, असे त्यांनी नमूद केले.
या कार्यक्रमात निवडक लेखकांना बसवराज कट्टिमनी कादंबरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी डॉ. डी.एस. चौगले, डॉ. एच.बी. कोलकार, कन्नड आणि संस्कृती विभागाच्या उपसंचालिका विद्यावती भजंत्री, प्रा. बी.बी. बिरादार, प्रा. अशोक कांबळे, डॉ. नागराज मुरगोड, डॉ. सुरेश हनगंडी, डॉ. विजयमाला नागानूरी, डॉ. यल्लप्पा हिम्मडी, साहित्यप्रेमी आणि साहित्यिक, यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
Recent Comments