Uncategorized

दसरा येण्यापूर्वीच सिद्धरामय्या सत्ता गमावणार: श्रीरामालुंचे भाकीत

Share

दसरा येण्यापूर्वीच सिद्धरामय्या सत्ता गमावणार: श्रीरामालुंचे भाकीत
भाजपमध्ये दर ३ वर्षांनी अध्यक्ष बदलतात
कर्नाटक सरकार बिहार निवडणुकीसाठी ‘एटीएम’सारखी वसुली करतंय
काँग्रेस सरकारमध्ये आमदारांना किंमत नाही; माजी मंत्री श्रीरामालुंचा हल्लाबोल

दसरा उत्सव सुरू होण्यापूर्वीच मुख्यमंत्री सिद्धरामय्या आपली सत्ता गमावतील, असे भाकीत माजी मंत्री आणि विद्यमान भाजप आमदार श्रीरामालु यांनी केले आहे.

बागलकोटमध्ये माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, काँग्रेस आमदार बी.आर. पाटील, राजू कागे यांच्यासह अनेकांनी आपला असंतोष व्यक्त केला आहे. गॅरंटी योजनांवर निवडून आलेल्या काँग्रेस सरकारमध्ये आमदारांना किंमत राहिलेली नाही. आता नोव्हेंबर किंवा दसऱ्यापर्यंत नेतृत्वात बदल होण्याची चर्चा सुरू आहे. दसऱ्याच्या उत्सवाच्या तयारीपूर्वीच मुख्यमंत्री सिद्धरामय्या आपली सत्ता गमावतील अशी लक्षणे दिसत आहेत, असे ते म्हणाले.

“आमचा एक राष्ट्रीय पक्ष आहे आणि आम्ही पक्षाच्या हायकमांडच्या निर्णयाला बांधील आहोत. आमच्या पक्षात दर तीन वर्षांनी प्रदेशाध्यक्ष बदलले जातात, परंतु आजपर्यंत कोणत्याही अध्यक्षाची मुदत मधूनच कमी करण्यात आलेली नाही,” असेही त्यांनी स्पष्ट केले.

विरोधी पक्षनेत्याला बदलणार असल्याची माहिती आम्हाला नाही. पण, आर. अशोक विधानसभेच्या आत आणि बाहेर सरकारविरोधात सक्रियपणे आपली जबाबदारी पार पाडत आहेत. मुख्यमंत्री सिद्धरामय्या स्वतःच्या आमदारांना किंवा सरकारच्या अधिकाऱ्यांनाही आदर देत नाहीत. मग ते विरोधी पक्षनेत्यांना कोणता आदर देतील? असा सवाल त्यांनी केला. तसेच, बिहार निवडणुकीसाठी पैसा जमवण्यासाठी राज्य सरकार ‘एटीएम’सारखी वसुली करत असल्याचा आरोपही श्रीरामालुंनी केला.

Tags: