Belagavi

ज्योती सेंट्रल स्कूलमध्ये ‘समीक्षात्मक आणि रचनात्मक विचार’ कार्यशाळा

Share

दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळाच्या ज्योती सेंट्रल स्कूलमध्ये ‘समीक्षात्मक आणि रचनात्मक विचार’ या विषयावर आधारित कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

बेळगाव येथील दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळाच्या ज्योती सेंट्रल स्कूलमध्ये मुख्याध्यापिका सोनाली कंग्राळकर यांच्या मार्गदर्शनाखाली सी.बी.एस.ई. शिक्षकांसाठी दोन दिवसांच्या समीक्षात्मक आणि रचनात्मक विचार या विषयावर आधारित कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यशाळेत ए.बी. पाटील पब्लिक स्कूल, संकेश्वर येथील समन्वयक गुलताज खान आणि लव्हडेल सेंट्रल स्कूल, बेळगाव येथील सी.बी.एस.ई. प्रशासकीय अधिकारी कविता कुलकर्णी यांनी रिसर्च पर्सन म्हणून भाग घेतला.

या कार्यशाळेत बेळगाव जिल्ह्यातील आणि आसपासच्या विविध सी.बी.एस.ई. शाळांमधील ६० हून अधिक शिक्षकांनी सहभाग घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेच्या शिक्षिका कृपा कदम यांनी केले.

Tags: