Bagalkot

बागलकोट: पाणी पाऊचमध्ये आढळले नट-बोल्ट!

Share

बागलकोट: जिल्ह्यातील इलकल तालुक्यातील गोरबाळ येथे एका ‘कॅरिबो’ पाण्याच्या पाऊचमध्ये नट-बोल्ट आढळल्याने ग्राहकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

गोरबाळ गावातील दीपा ॲक्वा मिनरल्स कंपनीने तयार केलेल्या ‘कॅरिबो’ पाऊचमध्ये हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. अशोक पुजारी नावाच्या एका ग्राहकाने खरेदी केलेल्या पाऊचमध्ये नट-बोल्ट आढळून आले. यामुळे ग्राहकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. अशोक पुजारी यांनी तात्काळ या घटनेची माहिती अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांना दिली.

अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली असून, त्यांनी संबंधित पाऊच ताब्यात घेतले आहे. या घटनेची चौकशी सुरू करण्यात आली आहे.

Tags: