Khanapur

खानापूर तहसीलदार कार्यालयासमोर कारवर सापाचे दर्शन

Share

खानापूर तहसीलदार कार्यालयाच्या समोरील आवारात उभ्या असलेल्या एका कारवर अचानक साप दिसला. यामुळे काही काळ परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. नेहमीच वर्दळीच्या आणि वर्दळ असणाऱ्या या ठिकाणी साप दिसल्याने काही काळ लोकांनी धास्ती घेतली होती. महसूल विभागाचे ग्रामसेवक इब्राहिम तहसीलदार यांनी आपल्या मोबाईलमध्ये या सापाचा व्हिडिओ कैद केला. काही वेळाने तो साप पाहता पाहता गर्दीतून दूर निघून गेला.

Tags: