M K HUBLI

एम.के. हुबळी-पारिशवाड राज्य महामार्गाची दुरवस्था

Share

एम.के. हुबळी-पारिशवाड राज्य महामार्गाची पावसाळ्यामुळे मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. हा रस्ता तातडीने दुरुस्त न केल्यास गडिनाडू हितरक्षण वेदिका आणि डीएसएसतर्फे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.

एम.के. हुबळी-पारिशवाड रस्ता पावसाळ्यामुळे पूर्णपणे खराब झाला असून, रस्त्यांवर खड्डे पडून पाणी साचले आहे. यामुळे वाहनचालक आणि ग्रामस्थ मोठ्या अडचणींचा सामना करत आहेत. नागरिकांनी संताप व्यक्त करत, अधिकारी आणि आमदारांनी तात्काळ लक्ष घालण्याची मागणी केली आहे.

या संदर्भात बोलताना गडिनाडू हितरक्षण वेदिकेचे तालुकाध्यक्ष राजू खाथेदार म्हणाले, एम.के. हुबळी-पारिशवाड रस्ता खूप खराब झाला आहे. पावसामुळे रस्त्यांवर खड्डे पडून पाणी साचले आहे, ज्यामुळे वाहनचालकांची गैरसोय होत आहे. ग्रामस्थांना रुग्णालयात जाण्यासाठी आणि इतर कामांसाठी मोठ्या अडचणी येत आहेत. गेल्या वर्षीच रस्ता दुरुस्त करण्यात आला होता, पण तो इतक्या लवकर खराब झाला, हे निकृष्ट कामाचे द्योतक आहे. लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांनी याकडे तातडीने लक्ष देऊन रस्ता दुरुस्त न केल्यास, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा त्यांनी दिला.

पुढे बोलताना बेळगाव जिल्हा डीएसएसचे सरचिटणीस राजशेखर हिंडलगी म्हणाले, एम.के. हुबळी-खानापूरमार्गे गोव्याला जोडणारा हा राज्य महामार्ग आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग धिकारी आणि स्थानिक आमदारांनी याकडे दुर्लक्ष केले आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री आपल्या जिल्ह्यातील असूनही या रस्त्याची दुरवस्था झाली असून, नागरिकांना खूप त्रास होत आहे. दरवर्षी पावसाळा आला की हा रस्ता चर्चेत येतो, तात्पुरती दुरुस्ती केली जाते आणि परिस्थिती पुन्हा तशीच होते. यामुळे नागरिक आणि शेतकऱ्यांना खूप त्रास सहन करावा लागतो. वाहनचालक पडून जीव गमावल्यास अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि आमदारच जबाबदार असतील. रस्ता तातडीने दुरुस्त न केल्यास तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा त्यांनी दिला.

Tags: