बेळगाव शहरातील खडक गल्ली परिसरातील पाण्याची समस्या दूर करण्यासाठी उत्तर मतदारसंघाचे आमदार आसिफ सेठ यांनी आज बोरवेल खोदण्याच्या कामाला सुरुवात केली. नगरसेवक मुझम्मिल डोणी यांच्या उपस्थितीत या कामाचे उद्घाटन करण्यात आले.

आमदार असिफ सेठ यांनी परिसराची पाहणी करून नागरिकांच्या अडचणी ऐकून घेतल्या. यावेळी बोलताना ते म्हणाले, , जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आणि आवश्यक मूलभूत सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी माझे प्रयत्न सुरू राहतील,.
यावेळी या भागातील नागरिकांची उपस्थिती होती.
Recent Comments