बेळगाव येथील समर्थ नगरमध्ये श्री एकदंत युवक मंडळाच्या वतीने संकष्टी चतुर्थीनिमित्त लाडक्या बाप्पाचे पाद्यपूजन आणि पाठपूजन मोठ्या भक्तिभावाने पार पडले.

शनिवार, १४ जून २०२५ रोजी सायंकाळी ७ वाजता गल्लीतील ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते पाद्यपूजन आणि पाठपूजन करून महाआरती करण्यात आली. यावेळी सुवासिनी महिलांनी आकर्षकपणे सजवून आणलेल्या आरत्यांनी वातावरण भक्तीमय झाले होते. त्यानंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.
यावेळी ज्येष्ठ नागरिक रजत पाटील यांनी बोलताना सांगितले की, यावर्षी हे मंडळाचे ५ वे वर्ष असून, आपण मोठ्या दिमाखात गणेशोत्सव साजरा करूया. मंडळाचे अध्यक्ष म्हणाले की, आमचे मंडळ कमी वेळातच सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये अग्रेसर झाले आहे आणि याचे श्रेय मंडळाच्या कार्यकर्त्यांना जाते. यापुढेही आमच्या मंडळाकडून असेच कार्य व्हावे, अशी गणरायाकडे प्रार्थना करतो.
अशोक खवरे यांनी सांगितले की, कमी वेळात प्रसिद्धी मिळवलेले हे मंडळ एकमेव असून, देखावा स्पर्धेत सलग दोन वेळा प्रथम पारितोषिक पटकावले आहे. यंदाही आपण सामाजिक विषयावर आधारित देखावा सादर करणार आहोत.
यावेळी महिला मंडळ आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी युवकांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अरुण गावडे यांनी केले
Recent Comments