विजापूर जिल्ह्यातील चडचण उपसा सिंचन प्रकल्पांतर्गत बसवण्यात आलेल्या पाइपलाइनच्या नकाशाची पाहणी आज जवळील हालहळ्ळी गावातील एका शेतात केबीजीएनएलचे एम. डी. मोहनराज यांनी केली. यावेळी नागठाण मतदारसंघाचे आमदार विठ्ठल कटकादोंड उपस्थित होते. सुमारे आठ वर्षांपूर्वी काँग्रेस सरकारच्या काळात ४८० कोटी रुपयांच्या निधीतून हाती घेण्यात आलेले चडचण उपसा सिंचन प्रकल्पाचे काम अद्यापही पूर्ण झालेले नाही.

अधिकारी आणि कंत्राटदारांनी निधीचा अपहार केला असल्याचा आरोप आमदार विठ्ठल कटकादोंड यांनी यावेळी केला. या प्रसंगी चडचण भागातील अनेक शेतकरी आणि प्रमुख नेते उपस्थित होते.
Recent Comments