हुक्केरी शहरातील टी.आर. असोसिएट्स पेट्रोल पंपाजवळ एक महाकाय अजगर दिसल्याने नागरिकांची गर्दी जमली होती. हुक्केरी शहरातील जाबापूरजवळ असलेल्या पेट्रोल पंपापाशी हा अजगर अचानक दिसला.


उन्हामुळे बिळात असलेल्या या सापाने अचानक पाऊस आल्याने बिळातून बाहेर येऊन पेट्रोल पंपाच्या आत शिरण्याचा प्रयत्न केला. मात्र, तेथे मोठ्या संख्येने लोक जमल्याने हा अजगर रस्त्यावर इकडे-तिकडे फिरून पुन्हा बिळात शिरला. काही काळ नागरिकांनी या अजगराला पाहून आनंद व्यक्त केला.
राजू बागलकोटी, इन न्यूज हुक्केरी.


Recent Comments