Chikkodi

येडूरवाडीत आंतरराज्यीय बैलगाडा शर्यत उत्साहात

Share

चिकोडी तालुक्यातील येडूरवाडी गावात श्री लक्ष्मी देवीच्या यात्रेनिमित्त आयोजित आंतरराज्यीय बैलगाडा शर्यतीत मानकापूर गावातील दादा महाराज यांच्या बैलगाडीने प्रथम स्थान पटकावून २०,००१ रुपयांचे बक्षीस जिंकले.

पेलू हरेला यांच्या गाडीने द्वितीय स्थान मिळवत १५,००१ रुपयांचे तर हर्षद वाडकर यांच्या गाडीने तृतीय स्थान मिळवत १०,००१ रुपयांचे बक्षीस पटकावले. घोडागाडी शर्यतीत यडूरवाडीचे चिदानंद इंगळे यांनी प्रथम स्थान, यडूरवाडीचेच निखिल माने यांनी द्वितीय स्थान आणि मानकापूरचे सोमनाथ हरेला यांनी तृतीय स्थान पटकावले.

बैल पकडून धावण्याच्या स्पर्धेत सोन्या नागराळ यांनी प्रथम, हरण्या नागराळ यांनी द्वितीय आणि लोकूरचे संकेत माने यांनी तृतीय स्थान मिळवले. धावण्याच्या स्पर्धेत सांगलीचे राहुल चव्हाण यांनी प्रथम, शिवानंद नाईक यांनी द्वितीय आणि शहाजी धनगर यांनी तृतीय स्थान मिळवले. विजेत्यांना समिती सदस्य आणि गावातील मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. ही शर्यत पाहण्यासाठी सीमाभागातील ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती.

यावेळी सदाशिव पाटील, दत्ता पवार, दीपक माने, सदाशिव सावळे, राजू चव्हाण, किटळ येळवंते, गुरलिंग माने, पिंटू चुपडे, बाळकृष्ण माने, राजू खारबारी, विनायक माने, बापू पुजारी, कुमार सनदी, संतोष बेडगे, केदारी इंगळे, अप्पू कानडे यांच्यासह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.

Tags: