बेळगावातील टिळकवाडी येथील मराठा कॉलनीचे रहिवासी आणि बेळगावातील ‘आयईआय लोकल सेंटर’ संस्थेचे संस्थापक सदस्य विरूपाक्षप्पा बसप्पा जावूर (८९) यांचे आज निधन झाले.

त्यांच्या पश्चात एक मुलगा, सून, तीन मुली, जावई आणि नातवंडे असा मोठा परिवार आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग आणि जलसंपदा विभागात त्यांनी मोलाची सेवा दिली होती. आज, रविवार, सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास बेळगावातील सदाशिवनगर येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जातील.
Recent Comments