संतिबस्तवाड येथे मुस्लिम धर्मग्रंथाची विटंबना झाल्याचे प्रकरण आता सीआयडीकडे वर्ग करण्यात आले आहे, अशी माहिती बेळगावचे पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे यांनी दिली.

बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील संतिबस्तवाड येथे ही घटना घडली होती. या घटनेचा तपास यापूर्वीच सुरू करण्यात आला होता, मात्र प्रकरणाची संवेदनशीलता लक्षात घेऊन ते आता सीआयडीकडे वर्ग करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आयुक्त बोरसे यांनी नमूद केले की, त्यांनी सीआयडी अधिकाऱ्यांना सर्व संबंधित कागदपत्रे तातडीने हस्तांतरित करण्यास सांगितले आहे. पोलीस दल सीआयडी अधिकाऱ्यांना तपासात पूर्ण सहकार्य करेल. “आम्ही शक्य तितक्या लवकर आरोपींचा शोध घेऊ,” असे आश्वासन त्यांनी दिले. गुन्हेगारी रोखण्यासाठी ग्रामीण भागात बीट पोलिसांची गस्त वाढवली जाईल, असेही आयुक्त भूषण बोरसे यांनी स्पष्ट केले.
Recent Comments