खानापूर तालुका कर्नाटक युनियन ऑफ वर्किंग जर्नलिस्ट्सच्या अध्यक्षपदी काशिम हट्टीहोळी यांची निवड झाली आहे. त्यांच्यासोबत उपाध्यक्षपदी वासुदेव चौगुले आणि कार्यवाहपदी प्रसन्न कुलकर्णी यांची निवड करण्यात आली आहे.

कार्यरत पत्रकार संघाच्या खानापूर तालुका युनिटच्या अध्यक्षपदी संयुक्ता कर्नाटक वृत्तपत्राचे बातमीदार काशिम हट्टीहोळी यांची निवड झाली आहे. पुढारी मराठी वृत्तपत्राचे बातमीदार वासुदेव चौगुले यांची उपाध्यक्षपदी, तर प्रसन्न कुलकर्णी यांची प्रधान कार्यवाहपदी निवड झाली आहे. याशिवाय, जिल्हा प्रतिनिधी म्हणून रुद्रेश संपगावी यांची निवड करण्यात आली आहे.
संघाच्या सदस्यपदी पिराजी कुराडे, किशोर मिठारी, अल्ताफ बसरिकट्टी, संदीप सुतार, शंकर देसुरकर, रावजी बिर्जे, आणि भरत पाटील यांची निवड झाली आहे. निवड झालेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचा पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला. येत्या काळात पत्रकार संघाला अधिक बळकट करण्यासाठी आणि सर्व सदस्यांना विश्वासात घेऊन कार्य करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.
निवडून आलेल्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार संघाच्या विकासासाठी आणि सदस्यांच्या विश्वासाला पात्र ठरून कार्य करावे, असे मार्गदर्शनही यावेळी करण्यात आले.


Recent Comments