महाराष्ट्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कृष्णा नदीतील पाण्याची पातळी लक्षणीय वाढली आहे. यामुळे चिकोडी तालुक्यातील नदीकाठच्या लोकांना सतर्क राहण्याचा इशारा तालुका प्रशासनाने दिला आहे.

हिप्परगी धरणातून कृष्णा नदीत सध्या ४० हजार क्यूसेक पाणी सोडण्यात आले आहे. कृष्णा नदीत २५ हजार क्यूसेकहून अधिक पाण्याची आवक सुरू असून, नदीपात्रात उतरण्यास लोकांना सक्त मनाई करण्यात आली आहे.
बेळगाव जिल्ह्यातील चिकोडी तालुका प्रशासनाने कृष्णा नदीच्या काठी हाय अलर्ट जारी केला आहे. लोकांना नदीकडे न जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
सततच्या पावसामुळे कोल्हापूरमधील पंचगंगा नदीचीही पाण्याची पातळी वाढली आहे. यामुळे पंचगंगा नदीवरील अनेक ब्रिज-कम-बॅरेज पाण्याखाली गेले आहेत. या भागातील वाहतूक थांबवण्यात आली असून, सुरक्षेसाठी पोलिसांना तैनात करण्यात आले आहे.


Recent Comments