Chikkodi

कृतिका नक्षत्राच्या पावसाने कृष्णा, दूधगंगा, वेदगंगेला नवसंजीवनी

Share

उन्हाच्या तीव्र झळा आणि पाणीटंचाईने हैराण झालेल्या सीमाभागातील लोकांना कृत्तिका नक्षत्राच्या पावसाने मोठा दिलासा दिला आहे.गेल्या दोन दिवसात झालेल्या पावसामुळे सीमाभागातील कृष्णा, दूधगंगा आणि वेदगंगा या नद्यांमधील पाण्याची पातळी अचानक ४ फुटांपर्यंत वाढली आहे.

शेजारच्या महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यांमध्ये तसेच चिकोडी व निपाणी तालुक्यात झालेल्या पावसामुळे आटलेल्या कृष्णा आणि उपनद्यांना पुन्हा नवसंजीवनी मिळाली आहे. सतत कोसळणाऱ्या पावसामुळे कृष्णा, दूधगंगा आणि वेदगंगा नद्यांमधील पाण्याची पातळी सुमारे ४ फुटांनी वाढली आहे. सखल भागांमध्ये पाणी साचून तळ्यांचे स्वरूप आले आहे.

चिकोडी आणि निपाणी तालुक्यातील नदीकाठच्या गावांमध्ये तसेच शहरांमध्ये नागरिक आणि जनावरांसाठी पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाली होती. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून पाण्याची पातळी वाढल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

Tags: